स्थैर्य, मुंबई, दि.१२: रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानोबत बॉलिवूडमधील ४ मोठी नावे समोर आली आहेत. यांची नावे ड्रग्स कनेक्शनमध्ये जुळले आहेत. रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.टाइम्स नाउकडे रिया चक्रवर्तीने दिलेल्या तीन नावांची माहिती आहे.एनसीबीसमोर रियाने जी नावे घेतली त्यात अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, एनसीबी यांच्या विरोधात पुरावे जमा करतील आणि त्यांना समन पाठवेल.
सारा, रकुलप्रीतच्या नावांचा समावेश
सारा अली खान, रकुरप्रीत सिंह आणि सिमोन खंबाटाबाबत सांगायचं तर साराचं नाव सुशांतच्या थायलॅंड ट्रीपमध्ये समोर आलं होतं. सिमोनचं नाव ड्रग्स चॅटमधून समोर आलं होतं. तर रकुलप्रीत सिंहचं नाव रियाने एनसीबीच्या चौकशीदरम्यान घेतल्याचे समजते. तसेच यात निर्माता आणि दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचंंही नाव समोर आलं आहे.एनसीबीने कोर्टात सांगितले की, त्यांचा तपास प्राथमिक स्तरावर आहे आणि रियाने चौकशी दरम्यान अनेक मोठ्या कलाकाराची नावे घेतली आहेत. एनसीबीने सांगितले की, तिने एक पूर्ण मनी ट्रेल तयार केलंय. ज्यातून हे समजतं की, या ड्रग्स रॅकेटमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. दरम्यान एनसीबी आता या प्रकरणात डोजिअर तयार करत आहे. डोजिअर म्हणजे पुरावे आणि कागदपत्रांचा पूर्ण गठ्ठा आहे. जे मुंबईतील या ए-लिस्टर ड्रग रॅकेटचा पूर्ण भांडाफोड करेल. दिल्ली ते मुंबईपर्यंत एनसीबी टीम कामाला लागली आहे.
रियाला जामिन नाहीच
रियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने रियासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढच्या आठवड्यात हायकोर्टात जाण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले आहे. रियासह शोविकच्या जामीन अर्जावर न्यायालय आज निर्णय दिला आहे. भायखळा जेलमध्ये ज्या सेलमध्ये रियाला ठेवलं गेलं आहे ती सर्वसाधारण बॅरेकजवळ आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीही या जेलमध्ये बंद आहे. रियाचा सेल इंद्राणी मुखर्जीजवळ आहे.
रिया चक्रवर्तीच्या अटकेआधी एनसीबीने तिचा भाऊ शोविक याच्यावर कडक कारवाई करत अटक केली होती. शोविकबरोबरच इतर अनेक ड्रग पेडलर्सनाही एनसीबीने अटक केली. रियाने शोविकबरोबरच्या ड्रग चॅटचा खुलासा केला होता. एनसीबीने रियावर केलेल्या चौकशीत ड्रग्स खरेदी केल्याची कबुली दिली. पण ड्रग्ज घेण्याबाबत नकार दिला. रिया असेही म्हणाली की ती सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करीत असे. तसेच शोविकने देखील आपल्या जबाबत मी ड्रग्जची सुशांतला व्यवस्था करत असून त्यासाठी बहीण रिया पैसे देत असल्याचं कबूल केले आहे.
रियाचा भावाला १४ दिवस न्यायालयीन कोठडी
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून इतरांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवार हा रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसाठीसुद्धा खूप महत्वाचा होता. बुधवारी एनसीबीचा रिमांड संपला, अशा परिस्थितीत शोविकला कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रियासह तिचा भाऊ शोविक, सुशांतचा कुक दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद आणि सॅम्युअल मिरांडा यांचा जामीन आज सेशन्स कोर्टाने फेटाळून दणका दिला आहे.