
दैनिक स्थैर्य । 24 मे 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयातील महिला कुस्तीपटू ऋतुजा पवार हिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कुस्ती संघाची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा या पलवाल, (हरियाणा) या ठिकाणी होणार आहेत.
याबद्दल तिचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य प्रा.डॉ.पी.एच.कदम यांनी हार्दिक अभिनंदन केले.