हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, आर्थिक कारभारासह धार्मिक विधी सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


महाराष्ट्रात अद्याप मॉल उघडण्यास परवानगी नाही

स्थैर्य, नवी दिल्ली दि. 07 : देशात अनलॉक-1 ला 7 दिवस पूर्ण झाले आहेत. 75 दिवसांनंतर सोमवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, आर्थिक कारभारासह धार्मिक विधी सुरू होतील. केंद्राचे दिशानिर्देश मिळताच दिल्ली, गुजरातसह 17 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत सोमवारी कंटेनमेंट झोनबाहेरील मॉल सुरू होतील. महाराष्ट्रात अद्याप मॉल उघडण्यास परवानगी नाही. केरळात मंगळवारी मॉल उघडतील.

9 राज्यांनी मॉल सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. 7 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत जूनमध्ये मॉल बंदच राहतील. पूजा-उपासना होत असलेली 820 स्मारके सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्रालयाने केली. सर्वाधिक 111 स्मारके यूपीत सुरू होतील, तर कर्नाटकात 75, महाराष्ट्रात 65, मध्य प्रदेशात 60, गुजरातेत 77 स्मारक स्थळे सुरू होतील. या स्थळावर पूजा-उपासनेसाठी संख्या निर्धारित राहील व मास्क आवश्यक राहील. देशात पुरातत्व विभाग 3691 स्मारके-स्थळांचे संरक्षण करतो.

या राज्यांतील मॉल सुरू होणार

शॉपिंग सेंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ तनेजा यांच्या मते, सोमवारपासून आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, प. बंगाल, उत्तराखंड, यूपी, तेलंगण, राजस्थान, पंजाब, पुद्दुचेरी, कर्नाटक व हरियाणातील मॉल सुरू होतील. पंजाबमध्ये मॉलसाठी टोकन पद्धत लागू राहणार आहे.

या राज्यांत निर्णय नाही

हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, नागालँड, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा राज्य.

या राज्यांत 30 जूनपर्यंत बंद राहतील मॉल : महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, दमण-दीव या राज्यांत या महिन्यात मॉल बंद राहतील.

केंद्र सरकारची एसओपी : एसीचे तापमान 24 अंशांपेक्षा कमी ठेवता येणार नाही, मंदिरात घंटा वाजवण्यास बंदी

हॉटेल : डिजिटल पेमेंट होईल  स्पर्शाविना चेक-इन आणि चेक-आऊटची व्यवस्था करावी लागेल. खोल्यात ठेवण्यापूर्वी सर्व सामान निर्जंतुक केले जाईल.

मॉल : एसी 24 ते 30 अंश, आर्द्रता 40 ते 70 % ठेवावी लागेल. एलिव्हेटरवर मर्यादित संख्या निश्चित करावी लागेल. फूड कोर्टमधील निम्मी आसने रिकामी राहतील.

मास्कविना पूजास्थळी प्रवेश नाही. मूर्ती-ग्रंथांना स्पर्श करता येणार नाही. घंटा वाजवण्यावर बंदी. बसून पूजा करण्यासाठी घरातून चटई न्यावी लागेल. प्रसाद, तीर्थ शिंपडण्यावर बंदी.

रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्याऐवजी टेक अवेला उत्तेजन. होम डिलिव्हरी करणारे पार्सल दारात ठेवतील. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी थर्मल स्क्रीनिंग केली जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!