दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२४ | फलटण | छ. शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा येथील एस. टी. बस स्थानक परिसर येथे सध्याच्या अर्ध पुतळ्याच्या जागी उभारण्यात येणार असून आज आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले.
छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळा उभारणेकामी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समिती गठीत करण्यात आली असून त्या माध्यमातून आवश्यक मान्यता घेण्यात आल्या आहेत, शासनाने छ. शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण कामासाठी ६० लाख रुपयांचा भरीव निधी शासनाने उपलब्ध करुन दिला असून त्यामधून चबुतरा व परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे तर पुतळ्यासाठी देणग्या जमा करण्यात येत आहेत. पुतळ्याची ऑर्डर दिली असून त्याची प्रतिकृती सर्वांना पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.