स्थैर्य, मुंबई, दि.०२: मागणीत वृद्धीच्या आशावादाने तेलाचे दर वाढले. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, कालच्या व्यापारी सत्रात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर २.१ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. अमेरिका आणि चीनसारख्या अर्थव्यवस्थांमध्ये मजबूत वृद्धी दिसून आल्याने हे दर ६७.७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. कारखान्यांतील कामकाजातही भरीव वाढ दिसून आल्याने जागतिक बाजारात तेलाच्या मागणीत सुधारणा झाली.
ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज अर्थात ओपेक आणि इतर सदस्यांनी येत्या काही महिन्यात उत्पादन कपात कमी करणे सुरुच ठेवण्याचे संकेत दिले. कारण या समूहाने मागणीत चांगलीच सुधारणा असल्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे तेलाच्या दरांना आधार मिळाला. प्रमुख तेल उपभोक्ता भारतातील कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होत असूनही ओपेक+ समूहाने उत्पादन कपात कमी करत, मे २०२१ ते जुलै २०२१ पर्यंत २.१ दशलक्ष बॅरल प्रति दिन उत्पादन करण्याचे आश्वासन दिले.
सोने: मंगळवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३२ टक्क्यांनी घसरून १९००.२ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. कारण अमेरिकेच्या ट्रेझरी उत्पानात वाढ दिसून आली. परिणामी नॉन-यील्ड धातूचे आकर्षण कमी झाले. अमेरिकन आर्थिक आकडेवारी एक आठवड्यानंतर जाहीर गोणार असल्याने इतर चलनधारकांसाठी सोने अधिक आकर्षक ठरले. तसेच अमेरिकी चलनही घसरणीवर राहिले. परिणामी सोन्याच्या दरातील घसरणीवर मर्यादा आल्या. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील बेरोजगारीचे दावे आणि पेरोम डेटावर बाजाराचे बारकाईने लक्ष आहे.
सोने, हे महागाईवर उतारा समजले जाते. सुरुवातीच्या सत्रात सोन्याने उच्चांकी स्थिती घेतली. कारण अमेरिकी कंझ्युमर प्राइस इंडेक्स एप्रिल २०२१ मध्ये वाढलेला दिसून आला. संभाव्य चलनवाढीचे संकेत देणारी अमेरिकेची अर्थव्यवस्थाही सुरू झाली.