दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । कायम दुष्काळी पिराचीवाडी गावात धोमबलकवडीच्या पाण्यामुळे सुबत्ता आली असल्याचे प्रतिपादन, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
पिराचीवाडी (ता.फलटण) गावामध्ये बिहार वृक्षलागवड पेटर्न अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी आमदार दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी हाराष्ट्र केसरी पैलवान बापूसाहेब लोखंडे, ढवळचे सरपंच अंकुश लोखंडे, सरपंच दीपक सावंत, पंढरीनाथ वेळेकर, चेअरमन संजय घोरपडे, जिजाबा जगताप, वाघोशीचे सरपंच ताराचंद पवार, पंकज सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार दीपक चव्हाण पुढे म्हणाले, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अथक परिश्रम व प्रयत्नांमुळे फलटण तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील सर्व गावांमध्ये धोमबलकवडी कालव्याचे पाणी आल्याने आज ज्या गावात दरवर्षी डिसेंबर अखेर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागायचे त्या गावामधून हजारो एकर ऊस उत्पादन घेतले जात आहे. शेती बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सार्वजनिक तसेच वैयक्तिक जागेमध्ये फळझाडे तसेच इतर प्रकारची झाडे लावावीत. नुसती झाडे लावून उपयोग नाही तर त्याची जोपासना ही झाली पाहिजे, असेही यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगीतले.
स्वागत ताराचंद सावंत यांनी केले. आभार रामदास कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कुंडलिक भांडलकर, संजय सावंत, श्रीरंग सावंत, शेरेवाडीचे उपसरपंच दिनकर चव्हाण, अनिल चव्हाण, कृष्णात सावंत, अक्षय सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.