
दैनिक स्थैर्य । 29 मे 2025। फलटण । गेले दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसाने ढवळ, ता. फलटण येथील श्री ढवळाईदेवी मंदिर ओढ्यावरील पूल खचला. त्यामुळे वस्तीवरील नागरिकांना व देवीच्या दर्शनासाठी ये- जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत होती.
या ठिकाणी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. व तत्परतेने या ओढ्यावर ओढ्यावर तीन फूट रुंदीच्या नऊ फूट लांबीच्या सहा सिमेंट पाईप दिल्या. पुलाचे काम सुरु होऊन येथील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. याबद्दल ढवण ग्रामस्थांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.