मुळीकवाडीसाठी श्रीमंत संजीवराजेंचा क्विक रिस्पॉन्स; ग्रामस्थांच्याकडून आभार


दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२५ । फलटण । तालुक्यातील मुळीकवाडी येथे असणारे धरणाच्या सांडव्याची भिंत संततधार व मुसळधार पावसाने पडली होती. सदरील प्रकार हा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी क्विक रिस्पॉन्स देत तातडीने दोन पोकलेन मशिनद्वारे तलावाची दुरुस्ती सुरू केली असल्याची माहिती मुळीकवाडीचे माजी सरपंच गणेश कदम यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना कदम म्हणाले की, अरबी सुमुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने फलटण तालुक्यात संततधार व मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे मुळीकवाडी येथील असणारा पाझरतलाव फुटला; त्याची दुरुस्तीसाठी श्रीमंत संजीवराजे यांनी तातडीची मदत केल्याने “अप्यत्य स्थाने प्रजाजन:” हे फलटण संस्थानाचे ब्रिदवाक्य आजच्या काळात सुध्दा राजे घराकडुन जपले जात असल्याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे.


Back to top button
Don`t copy text!