फलटण बाजार समितीत दर्जेदार भाजी मंडई सुरू करणार – श्रीमंत रघुनाथराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नगरपालिकेच्या हद्दीत भाजीमंई भरते. तेथे भाजीपाल्यासह फळे विकली जातात. मात्र, भारतात आज एक मोठं दुर्दैव आहे की,. बूट-चप्पल हे शोरूममध्ये विकले जातात, तर शेतकर्‍यानं पिकवलेला भाजीपाला जो तुम्ही-आम्ही रोज खातो, तो गटाराच्या कडेला विकला जातो. हे चित्र आम्ही बदलणार असून फलटण बाजार समितीत एक दर्जेदार, आरोग्यदायी भाजीमंडई सुरू करणार आहे, अशी माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजीमंडईतील शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींबाबत बोलताना ते म्हणाले की, नगरपालिका भाजीमंईत बसणार्‍या शेतकर्‍यांकडून कर स्वरूपात पावती फाडते. परंतु आज फलटणमध्ये तृतीयपंथीयांची एक टोळी आलेली आहे. ही टोळी भाजीमंडईत बसणार्‍या भाजी विकणार्‍या शेतकर्‍यांना व नागरिकांना खूप त्रास देत आहे. याबाबत पोलिसात तक्रार करावी व भाजीमंडईची जबाबदारी नगरपालिकेची असल्यामुळे व पावती घेत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या सुरक्षेची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी, अशी सूचना आम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना केली होती. मात्र, मुख्याधिकार्‍यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या व शेतकर्‍यांच्या सोईच्या द़ृष्टीकोनातून दर्जेदार स्वच्छ मंडई बांधण्याचा चंग फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने केला आहे. ही भाजीमंडई फलटण मार्केट कमिटीच्या आवारात बांधली जाणार असून ती ‘हायजेनिक’ व स्वच्छ मंडई नागरिकांना मिळणार आहे. येथे डुकरे, कुत्री व अन्य जनावरांचा कसलाही त्रास होणार नाही, असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.

श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले की, नगरपालिकेच्या हद्दीतील मंडईतही स्वच्छता राखून शेतकर्‍यांना तृतीयपंथीयांकडून होणारा त्रास बंद करावा व त्यासाठी पोलिसांनी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे मला वाटते.


Back to top button
Don`t copy text!