स्थैर्य, सातारा, दि. २९: आदरणीय स्व.भाऊसाहेब महाराजांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही अशी लोकभावना निर्माण झाली असतानाच शांत, संयमी परंतु, तेवढेच निश्चयी असलेल्या बाबाराजेंनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने भल्याभल्यांचे अंदाज फोल ठरवीत राजकारण- समाजकारण- सहकार आदि क्षेत्रातील यशाचे शिखर कसे व केव्हा गाठले याचा अंदाजच लागला नाही.आपल्या हक्काचा सातारा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत गमवावा लागल्यानंतर नवीन निर्माण झालेल्या सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातही विकासकामांच्या जोरावर त्यांनी प्रत्येक घराघरांत आपले एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक सुख- दु:खात सहभागी होणारे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी २४×७ सदैव उपलब्ध असणारे श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे शहरवासियांबरोबरचं वाडी- वस्तीतील रयतेस आपल्या हक्काचे वाटतात. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक समस्येचा सखोल अभ्यास करून दूरदृष्टीने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंचा मूळचाच स्वभाव असल्याने सद्यस्थितीत सरकार मध्ये विरोधात असूनही त्यांनी कोट्यवधी रुपयांचे विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून घेऊन आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवली.यामध्ये सातारा येथील मेडिकल कॉलेज मंजूरीसह रुपये ४९७ कोटींची तरतूद करुन घेतली.सातारा शहराची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन कास धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावास मान्यता घेऊन त्यासाठी रुपये ५७ .९८ कोटींची तरतूद करुन घेण्यात यश. तसेच, सातारा शहराची हद्दवाढ मंजूर करून घेऊन त्यांनी या ऐतिहासिक शहराच्या भविष्यातील सर्वांगीण प्रगतीची मूहुर्तमेढचं रोवली आहे.यापूर्वीच मा.ना.अजितदादा पवार यांचे माध्यमातून सुमारे रु. ३३ कोटींची शाहूपुरी साठीची नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजना तसेच सद्यस्थितीतही या प्रलंबित योजनेच्या पूर्णत्वासाठी अतिरिक्त रु.१२ कोटींचा निधी प्राप्त करून घेतला आहे.तसेच,शाहूपुरी साठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करुन घेऊन सातारा शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीही त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. सैनिक स्कूल सातारा हे आपल्या सातारवासियांचा अभिमान आहे. या शाळेच्या विकासासाठी चालू अर्थसंकल्पात रु.३०० कोटींची तरतूद करुन घेण्यातही ते यशस्वी झाले आहेत.सातारा तहसील व प्रांत कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा प्रश्नही त्यांनी शासन दरबारी अनपेक्षितपणे झटपट सोडविला आहे.याचबरोबर बोंडारवाडी धरण व धरणग्रस्त यांतील असणा-या अडचणी सोडवण्यासाठी सुध्दा त्यांनी मा.ना.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथाअर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न निकालात काढणेकामी पाऊले टाकली आहेत. आजवरची आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजेंची कार्यपद्धती पाहता याप्रश्नी ते नक्कीच यशस्वी होतील यात शंका नाही.
आपल्या मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह वाडी- वस्ती पर्यंत रस्ते विकास प्रकल्प राबवून डोंगरभागातील सर्वसामान्य रयतेच्या दळणवळणाच्या प्रश्नी सहज- सुलभता आणण्याकामी आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजेंचे मोलाचे योगदान आहे.गेल्या काही वर्षांत एकट्या शाहूपुरी परिसरातचं त्यांनी सुमारे ७.५० कोटींची रस्ते विकासाची कामे विविध शासन माध्यमातून पूर्ण केली आहेत याचे शाहूपुरीकर साक्षीदार आहेत. या जनहिताच्या विकास कामांबरोबरच सातारा MIDC मध्ये महाराष्ट्र स्कूटर सारखे उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी सुध्दा त्यांनी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी तसेच उद्योगपती श्री.राहुल बजाज यांचेशीही चर्चा केल्या आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना जर यश आले तर अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी व पालकांना खरोखरच खूप दिलासा मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र म्हंटले की, सहकार चळवळ आलीच.मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजेंनी स्व.भाऊसाहेब महाराजांचे पश्चात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची धुरा सुध्दा यशस्वीपणे सांभाळली असून को- जनरेशन प्लॅन्टची यशस्वी उभारणी करुन त्यांनी आपले सहकारातील योगदान सिध्द केले आहे.या कारखान्यात आजवर ऊसदरासाठी शेतक-यांना कधी दारात उभे राहण्याची वेळ त्यांनी येऊ दिली नाही.यांमुळेच हा कारखाना शेतकरी सभासदांना आपल्या हक्काचा वाटतो. याचबरोबरीने, त्यांनी सातारा जिल्ह्यातील सहकाराचा मानबिंदू असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद मोठ्या कौशल्याने सांभाळून जिल्हा बॅंकेचा कारभार महाराष्ट्र राज्यात अग्रेसर असाच ठेवला आहे.
अशा रीतीने राजकारण- समाजकारण व सहकार क्षेत्रात तावून सुलाखून निघालेले नेतृत्व म्हणजेच मा.आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा-जावलीसाठी फक्त नेते नाहीत तर ते आहेत श्री शिवछत्रपतींचा वारसा त्यांच्या विचारांतून समर्थपणे जपणारे प्रजाहितदक्ष,लोककल्याणाचे व्रत जपणारे …
लोककल्याणकारी- ‘लोकराजा’ श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले. अशा या आपल्या लोकराजास वाढदिवसदिनी मन:पूर्वक शुभेच्छा! राजे शतायुषी व्हा!
भारत भोसले, शाहूपुरी. शाहूपुरी ग्रामविकास आघाडी