
दैनिक स्थैर्य । 8 जुलै 2025 । सातारा । शेतकर्यांची मेहनत आणि इंद्रायणी तांदळाची ख्याती यामुळे भातशेतीच्या नकाशावर अग्रस्थानी असणार्या येथील परिसरात यंदाच्या हंगामात मे महिन्यापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली; परंतु सध्याच्या ऊन-पावसाच्या लपंडावामुळे भाताच्या तरव्यांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, भाताची तरवे पिवळे पडले असून, त्यांची वाढ खुंटली आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत असून, रोपांची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
कोपर्डे हवेली परिसरात भात पिकासाठी शेतकरी जमिनीची मशागत करून वाफे तयार करतात आणि भाताची तरवे लावतात. यंदा मे महिन्यातच पावसाने लवकर सुरुवात केल्याने तरवे टाकण्यास उशीर झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात टाकलेल्या तरव्यांवर जादा पावसामुळे काही शेतकर्यांचे तरव्याची उगवण झाली नाही, तर काही ठिकाणी उगवलेल्या तरव्यांना ऊन आणि पाऊस यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, तरवे पिवळी पडले, त्यांची उंची कमी झाली.
पावसाची अनिश्चितता आमच्यासाठी नवीन नाही, तरीही इंद्रायणी तांदळाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.कुजण्याची समस्या उद्भवली आहे. रोग नियंत्रणासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत असले, तरी यंदाच्या हंगामात भाताच्या तरव्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोपर्डे हवेलीचा इंद्रायणी तांदूळ अनोखी चव आणि सुवासासाठी पुणे, मुंबईसह अनेक शहरांमध्ये लोकप्रिय आहे. पाणी धरून ठेवणारी क्षारपड शेतजमीन ज्यामुळे तांदळाला खास चवआणि गुणवत्ता प्रदान करते; परंतु तरवे पिवळे पडण्याच्या स्थितीचे आव्हान शेतकर्यांसमोर आहे. पुढील काळात तरव्यांचे व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणासाठी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
..माधव चव्हाण, भात उत्पादक शेतकरी.
वातावरणामुळे तरव्यांची वाढ खुंटली असून, ते पिवळे पडले आहेत. बहुतांशी शेतकर्यांची तरवे वाया गेल्याने या हंगामात रोपांची टंचाई जाणवू शकते.
– विक्रम चव्हाण, भात उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली.