
दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ झाल्यामुळे जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
जळगांव येथे ६५० खाटांचे रुग्णालय व १५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे.