स्थैर्य, सातारा, दि.१९: दत्तनगर, सातारा येथे बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने पावणे दोन लाखाचा सोन्याज चोरून नेला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी, कोडोली-काळोशी रोड दत्तनगर येथे भापकर चाळीमागे गणपत बाळू सावंत यांचे घर आहे. दि. 10 ते 16 या कालावधीत सावंत यांचे घर बंद होते. या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर आतील 1 लाख 76 हजार 500 रुपयांचा राणीहार, चेन, मोहन माळ, लेडीज अंगठी व मोत्याची नथ, 1 हजार रोख, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 1 लाख 79 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास पो. उ. नि. एन. एस. कदम तपास करत आहेत.