
दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ सर्वत्र दि. १९ सप्टेंबर २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ अखेर साजरा होत आहे. तथापि, फलटण तालुक्यात या कालावधीत कायदा व सुव्यवस्था व तद्अनुषंगिक इतर काही अनुचित प्रकार घडू नये व गणेशोत्सव कालावधीत करावयाच्या नियोजनाच्या द़ृष्टीने फलटणचे उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक गुरुवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित केली होती, मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक शुक्रवार, दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता दरबार हॉल, अधिकार गृह, फलटण येथे घेण्यात येणार आहे.
या बैठकीस फलटणच्या मान्यवरांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.