महसूल मंत्री ना. विखे – पाटील उद्या फलटण दौऱ्यावर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२३ । फलटण । सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील हे पालखी मार्ग व्यवस्था व वारकरी निवास व्यवस्थेची पाहणी करण्याकरता पालखी मार्ग पाहणी दौऱ्यावर येत असून उद्या दि. 08 रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दुपारी 11 वाजता फलटण पालखी तळाची पाहणी करणार आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची, पालखी तळाची व वारकऱ्यांच्या व्यवस्थेबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करण्याकरिता उद्या दि. 08 रोजी फलटण पालखीतळावर येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!