फलटणमध्ये महसूल दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते गौरव


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । फलटण । येथे महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांसाठीच्या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी महसूल विभागाच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, “शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.” त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान, महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य मार्गदर्शन शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामात सुसूत्रता आणणाऱ्या ‘दैनंदिनी’चे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले.


Back to top button
Don`t copy text!