![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/42968fd8-f4cf-4be2-9af2-40a3351e9705.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. 09 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण शहरात मध्यवर्ती असलेल्या रेव्ह्येन्यू क्लबची पूर्णतः मोडकळीस आली आहे, या जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी मंजूर करून आणण्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण हातभार आहे. या कामासाठी समस्त महसूल परिवाराच्या वतीने निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
फलटणच्या रेव्ह्येन्यू क्लबची जुनी इमारत ही अनेक वर्षांपासूनची असून, ती आता पूर्णपणे जीर्ण झाली होती. या इमारतीच्या जागी नवीन आणि आधुनिक इमारत बांधण्याची गरज होती. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी या प्रकरणात विशेष प्रयत्न केले आणि राज्य सरकारकडून दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला. हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
रेव्हेन्यू सबोर्डिनेट वेलफेअर फंड कमिटी, फलटणचे अध्यक्ष आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत. अभिजित सोनवणे यांनी सांगितले की, “महसूल परिवाराच्या सुविधेसाठी ही नवीन इमारत अत्यंत महत्त्वाची आहे. या कामासाठी रणजितदादा व आमदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्हाला ही मंजुरी मिळाली आहे.”
रेव्हेन्यू क्लब हे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक केंद्र आहे. येथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. नवीन इमारतीमुळे येथील सुविधा आणखी वाढेल आणि अधिकारी व कर्मचारी यांना चांगल्या परिस्थितीत काम करण्याची संधी मिळेल.