स्थैर्य, खटाव, दि. ०४ : माण खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया वाळू तस्करी करत आहे अनेक वेळा स्थानिक नागरिक स्थानिक पोलिस कर्मचारी असतील महसूल कर्मचारी असतील यांना वारंवार तक्रार करून सुद्धा काही वाळू माफियांवर कारवाई केली जात नाही रोज दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून रात्री-अपरात्री वाहतूक करून प्रशासनाचा मोठा महसूल बुडवला जात आहे. यामध्ये वाळू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. तक्रारदारांनी तक्रार केली लगेच दुसऱ्या दिवशी वाळू माफिया तक्रारदाराला धमकी देण्यास कोणताही विचार करत नाही. म्हणजेच प्रशासनात गोपनीयता ही बाब शिल्लक राहिले नाही. काही भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वार्थासाठी सर्वसामान्य नागरिकांचा बळी दिला जात आहे खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासनातील काही लबाड लांडगे करत आहेत काही दिवसापूर्वी माण तालुक्यात सांगली ए सी बीने खाजगी इसमांना वर कोणत्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्या चे हप्ते वसूल करताना खाजगी इसमांना रंगेहात पकडले होते त्यावर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणे नागरिकांना अपेक्षित होते परंतु अध्याप अशी कोणतीही करवाही झालेली दिसून आली नाही तो प्रकार तिथेच थांबला आहे अशी चर्चा सर्वसामान्यत सुरू आहे वारंवार सोशल मीडियावर वाळू माफिया बद्दल माहिती प्रसिद्ध केली जाते परंतु प्रशासनातील काही लबाड लांडगे स्वतःच्या स्वार्थासाठी या वाळू माफियांना सपोर्ट करत आहेत प्रशासनाने प्रत्येक गावात त्यांचे प्रशासकीय कर्मचारी नेमले आहेत त्यांना पगार प्रशासना ची कामे करण्यासाठी दिला जातो परंतु काही प्रशासकीय कर्मचारी भलतेच उद्योग करत आहेत ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील यांचा रोजचा संपर्क प्रत्येक गावात होत असतो यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या तर वाळूचा अवैद्य रित्या एकही खडा विकता येणार नाही परंतु या सर्वांचा वाटा वाळू माफिया वेळोवेळी सर्वान पर्यंत पोचवत असतात काही दिवसांपूर्वी काही नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहेत जवळ पैसा नसतानासुद्धा त्या नागरिकांनी पाहुणेरावळे यांकडून उसने पैसे आणून काम सुरू केले होते ते पत्र्याचे घर पाडून नवीन घर बांधण्याचे स्वप्न शासनाने त्यांना दाखवले परंतु वाळू अभावी त्यांचे ते घर व स्वप्न अपुरे राहिले खटाव-माण मध्ये प्रत्येक गावात अलिशान बंगले अपार्टमेंट शासकीय काम अशी मोठ्या प्रमाणात चालू आहेत यांना वाळू कुठून येते व कोण टाकतोय याची जर चौकशी केली तर प्रशासनाचा महसूलही वाढेल आणि मोठ्या प्रमाणात होत असणारी वाळू तस्करी ही थांबेल परंतु यावर कोणाचेही लक्ष नाही कारण सर्वांना आप आपला वाटा वेळोवेळी मिळत आहे सर्वसामान्य चे घर नोंद करायचे म्हण ले तर त्यांना शासनाच्या अनेक नियमाचे बंधन आहे त्याशिवाय त्याचे घर नोंद केली जात नाही परंतु अवैधरित्या वाळू साठा करून बांधकाम करणाऱ्या बोगस बांधकाम नोंद केले जाते या विषयावर जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून तहसीलदार ग्रामसेवक तलाठी यांना व स्थानिक पोलिस स्टेशन यांना तात्काळ आदेश काढावेत की घर आपारमेंट व इतर मोठ्या प्रमाणात चाललेले शासकीय कामाच्या तिथे वाळू कोठून येते कोण वाळू विक्री करते त्याच्याजवळ त्या विक्रीच्या परवाना नसला तर वाळू तस्करी करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावे व अवैधरित्या वाळू घेऊन बांधकाम करणाऱ्या चे बांधकाम अनाधिकृत आहेत असा शिक्का मारावा म्हणजे शासनाचा महसूल व शासनाची फसवणूक कोण करणार नाही एवढ्या साध्या सोप्या प्रयत्नाने वाळू तस्करी व प्रशासकीय क्षेत्रातील लबाड लांडग्याचे हप्ते वसुली बंद होऊन चांगल्या कारभाराची सवय लागेल ही मागणी सर्वसामान्य नागरिकाकडून केली जात आहे
वडूज पोलिस स्टेशनला नुकताच पदभार स्वीकारलेल्या सपोनि मालोजी राव देशमुख यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे कालच त्यांनी म्हसवड वरून पडळ या भागाकडे वाळू तस्करी करणारा ट्रक व 4 ब्रास वाळू जप्त करून गुन्हा दाखल केला आहे अशीच धडाकेबाज कारवाई प्रत्येक अधिकाऱ्याकडून नागरिकांना अपेक्षित आहे