दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२३ | फलटण |
आसू (ता. फलटण) येथे नीरा नदीमध्ये असणार्या स्मशानभूमीच्या जागेत साठवून ठेवलेल्या दहा ब्रास वाळूच्या साठ्यावर मंडल अधिकारी दिलीप कोकरे यांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसू येथे ‘पवारटेक’ नावाच्या शिवारात असणार्या स्मशानभूमीमध्ये अज्ञात वाळू चोरांनी वाळूचा साठा करून ठेवला होता. या साठ्याचा सुगावा महसूल कर्मचार्यांना लागताच महसूल खात्याचे मंडल अधिकारी दिलीप कोकरे, आसूचे तलाठी विष्णू कदम, पवारवाडीचे तलाठी महावीर अहिवळे, कोतवाल जाहिरुद्दिन शेख आणि पोलीस पाटील अशोक गोडसे यांनी येथे छापा टाकून हा वाळूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई उपविभागीय दंडाधिकारी सचिन ढोले, फलटणचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.