निवृत्त तहसीलदार विजयराव जाधव यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि. 18 ऑक्टोबर : करंजे येथील निवृत्त तहसीलदार विजयराव शंकरराव जाधव (वय 84) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या शासकीय सेवेत त्यांनी सातारा, कोरेगाव, मेढा, खटाव, फलटण आदी ठिकाणी तहसीलदार म्हणून कार्य केले. प्रामाणिक, कार्यतत्पर आणि मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी सदरबझार येथील योजनानगर गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वत्र लोकप्रिय होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी,भाऊ, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक संजय शिंदे यांचे ते सासरे होत.


Back to top button
Don`t copy text!