
दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । जय भवानी एज्युकेशन सोसायटी तिरकवाडीचे, जय भवानी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरकवाडी ता. फलटण जि. सातारा, विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक कै. शंकर बाबुराव माने (सर) यांचे आज सकाळी ९.०० वाजता दुःखद निधन झाले. ते उत्कृष्ट बीजगणिताचे शिक्षक होते.त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना तिरकवाडी गावासह तिरकवाडी पंचक्रोशीतील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच जयभवानी एज्युकेशन सोसायटी तिरकवाडीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व सर्व सदस्य, पदाधिकारी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांचेकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.जय गणेश फेस्टीव्हल क्रिडा मंडळ तिरकवाडी,सासकल जन आंदोलन समिती पदाधिकारी, प्रा.संजय सावंतसर यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.