
स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त शिक्षक चंद्रशेखर सदाशिव केसकर यांचे आज, शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी अकस्मात दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता विद्यानगर येथील पंचवटी अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.