
स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी काशीनाथ गेनबा पवार यांचे गुरुवारी सायंकाळी वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, सकाळी ९.३० वाजता गोळीबार मैदान येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली.
स्व. काशिनाथ पवार हे पत्रकार युवराज पवार यांचे थोरले चुलते होत.