निवृत्त नौदल अधिकाऱ्याचे मारहाण प्रकरण:अटक झालेल्या सहाही शिवसैनिकांना मिळाला जामीन, मुलगा म्हणाला – संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका, तर फडणवीस म्हणाले – ‘उद्धवजी हा गुंडराज थांबवा’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१२: आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईतील काही शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला होता. आता या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे. यामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख कमेलश कदम आणि पदाधिकारी संजय मांजरेंचाही समावेश आहे.

आज अनेक माजी सैन्य अधिकारी व कर्मचारी मदन शर्मा यांना भेटण्यासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल होणार आहेत. शर्मा यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी भाजपचे काही नेते रुग्णालयात पोहोचले होते. शर्मा यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, मुंबईत आज शहरातील विविध भागात भाजप आंदोलन करणार आहे. मदन शर्मा यांना थोड्या वेळापूर्वीच भाजपा नेते किरीट सोमैया भेटायला पोहोचले.

नेव्ही ऑफिसरचा आरोप – पोलिसांना त्यांनाच अटक करण्याचा केला प्रयत्न


दरम्यान, 65 वर्षांचे माजी नौदल अधिकारी म्हणाले की, घटनेच्या 45 मिनिटानंतर पोलिस त्यांनाच अटक करण्यासाठी दाखल झाले होते. या घटनेबाबत शर्मा म्हणाले की, 8-10 जणांनी माझ्यावर हल्ला केला व मला मारहाण केली. माझ्या मोबाईलवर एक व्यंगचित्र आले होते, जे मी एका ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. त्यानंतर मला अनेक धमकीचे कॉल आले. मी आयुष्यभर देशासाठी काम केले आहे. असे सरकार अस्तित्वात असू नये.

मुलगा म्हणाला – कुटुंबाला जीवाचा धोका, मुलगी म्हणाली – राष्ट्रपती राजवट लागू करा


मदन शर्मांचा मुलगा सनी शर्माने आरोप करत म्हटले की, ‘मी मुंबईत जन्मलो आहे आणि येथेच आमचे आयुष्य गेले आहे. तरीही नॉर्थ इंडियन असल्यामुळे माझ्या वडिलांना मारहाण झाली. शिवसैनिकांनी वयाचा मान न ठेवता त्यांच्यावर हल्ला केला. आता मला भीती वाटत आहे की, पुढेही मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे.’ तर शर्मांची मुलगी शीला शर्माने म्हटले आहे की, राज्यात अराजकता आहे. तसेच येथे राष्ट्रपती राजवट लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्या म्हणाल्या आहे की, शिवसेनेनेचे लोक सत्तेचा दुरुपयोग करत आहेत.

फडणवीस म्हणाले – गुंडाराज थांबवा उद्धव जी


माजी निवृत्त नौदल अधिकाऱ्याचे मारहाण प्रकरणी भाजपनेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की – ‘खुप दुःखद आणि अचंबित करणारी घटना आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला फक्त यामुळे मारहाण करण्यात आली कारण त्यांनी व्हॉट्सअपवर फोटो फॉरवर्ड केला होता. कृपया गुंडराज रोखा उद्धव जी. आम्ही या गुंडगिरी विरोधात कठोर कारवाई आणि शिक्षेची मागणी करतो.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!