
दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) फलटण आगारातील ज्येष्ठ चालक सयाजी वीर आपली प्रदीर्घ प्रवाशी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत. या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांनी कर्मचारी बंधूंकरीता १००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भेट देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
फलटण आगार वार्षिक उत्सव समितीमार्फत सयाजी वीर यांचा पूर्ण पोषाख, स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक रविंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, माऊली कदम, विवेक शिंदे, संजय टाकळे, केदार गरवारे, वीर यांचे कुटुंबिय तसेच बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
पाण्याची टाकी दिल्याबद्दल सयाजी वीर यांना एस. टी. प्रशासनातर्फे व कर्मचारी यांचेकडून धन्यवाद देण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीपाल जैन यांनी केले.