कोयना धरणातून पाणी सोडण्यास पुन्हा सुरुवात, सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले


स्थैर्य, पाटण, दि. २१ : कोयना धरण परिसरात पुन्हा पावसाला जोराने सुरुवात झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रतिसेकंद 36 हजार 659 क्युसेक्स इतके झाले आहे. त्यामुळे गुरुवारी बंद करण्यात आलेले सहा वक्र दरवाजे शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून प्रतिसेकंद 9,857 तर पायथा विजय गृहातून 2,100 असे एकूण प्रतिसेकंद अकरा हजार 957 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी असताना सध्या 93. 87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे ावसाचा जोर वाढून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी आवक वाढल्यामुळे अजूनही दरवाजे आणखीन वर उचलून त्यातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची शक्‍यता धरण व्यवस्थापन समितीने दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!