दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण नगरपरिषद यांनी जी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती; ती मोहीम पुन्हा सुरू करण्यात यावी. फक्त 1 ते 2 % नागरिकांसाठी ही मोहीम स्थगित करू नयेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सदस्य नंदकुमार मोरे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीचे प्रदेश सदस्य नंदकुमार मोरे यांनी भेट घेवून निवेदन दिले.
अतिक्रमण काढल्यामुळे फलटण शहरातील सौंदर्याला व सुशोभीकरणाला वाव मिळणार आहे. विशेषतः सदर थांबलेली अतिक्रमण मोहीम संचालक, नगररचना, सातारा व नगररचनाकार, फलटण नगरपरिषद यांनी संयुक्त सर्व्हे करून पारदर्शक पणे राबविण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आगामी काळात पारदर्शीपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाईल, असे आश्वासन दिले.
सदरील निवेदनाची प्रत ही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात आली आहे.