
स्थैर्य, फलटण, दि. 26 : किल्ले राजगडाच्या पायथ्याला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या आईसाहेब महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई महाराज यांच्या समाधीच्या जिर्णाध्दाराचे काम श्रीमंत सईबाईसाहेब समाधी ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुर्णत्वास येत आहे. याचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द गावातील गुंजवणी नदीकिनारी प्रेक्षणीय अशा नयनरम्य स्थळावर या समाधीचा जिर्णोध्दार सुरु असून लवकरच हे काम सुरू होईल. महाराणी श्रीमंत छत्रपती सईबाई महाराज यांच्या समाधीच्या जिर्णाध्दाराच्या कामात लक्ष घालून श्रीमंत रामराजेंनी देखणा सुंदर असा प्रकल्प अहवाल तयार करुन इतिहासाला उजाळा दिल्याबद्दल इतिहासप्रेमींनी आदरपूर्वक आनंद व्यक्त केलेला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे पर्यटन स्थळ विकसित होऊन इतिहास प्रेमींसह इतर पर्यटकांचीही वर्दळ वाढून परिसरातील सर्व पुरक व्यवसायांना व रोजगारालाही चालना मिळेल असे मत जाणकारांनाकडून व्यक्त होत आहे.