सलून दुकानेही पुर्ववत सुरु करा- आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणविसांकडे निवेदनाद्वारे केली मागणी

स्थैर्य, सातारा, दि. 05 : कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असताना लॉक डाऊनच्या चौथ्या टप्प्यात मॉल, रेस्टॉरंट, बार वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात इतर दुकानांसह सलूनची दुकानेही सुरु झाली होती. दरम्यान, पाचवा लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर मु‘यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग दोन- तीन महिने दुकाने बंद होती आणि आता पुन्हा दुकाने बंद झाल्याने सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांची आणि लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सलून दुकाने सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मु‘यमंत्री उध्दव ठाकरे, उपमु‘यंमत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र ङ्गडणविस यांच्याकडे केली आहे.

याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ईमेलद्वारे निवेदन पाठवले असून निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे गेले दोन- अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. दरम्यान, राज्य सरकारने राज्यभरातील सर्वप्रकारची दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र, सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपुर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील निर्बंध व नियमांचे पालन करण्याची अट घालून सलून दुकाने सुरु करण्यात आली होती मात्र हा निर्णय अचानक बदलला आणि पुन्हा ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नाभिक समाजातील सलून चालक, मालक आणि कारागिरांचे जगणे मुश्किल झाले आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी नुकताच मॉल आणि रेस्टॉरंट सुध्दा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सगळे व्यवसाय सुरु झाले पण, ङ्गक्त सलून दुकानेच बंद का? सलून दुकाने बंद ठेवून काय साध्य होणार आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लोकांनाही केस कापणे, दाढी करणे यासाठी सलून दुकाने सुरु असणे आवश्यक आहे. त्यामुळे सलून दुकाने बंद ठेवणे हा नाभिक समाजावरील अन्याय आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सलून चालक, मालक व कारागिरांची उपासमार टाळण्यासाठी कोरोनासंबंधीत नियम व निर्बंध घालून सलून दुकानेही पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!