प्लॅस्टिकमुक्त सज्जनगड’ अभियानास प्रतिसाद

वन विभागातर्फे वन दिनानिमित्त आयोजन; परिसराची स्वच्छता


स्थैर्य, 25 मार्च, सातारा : जागतिक वनदिनानिमित्त वनविभाग सातारा यांच्या वतीने किल्ले सज्जनगड येथे ‘प्लॅस्टिकमुक्त सज्जनगड स्वच्छता अभियान’ उत्साहात पार पडले. सज्जनगड परिसरात आयोजित या उपक्रमाला वन विभागाचे अधिकारी, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच व स्थानिक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन  करताना प्लॅस्टिकमुक्त सज्जनगड ही मोहीम सातत्याने राबविण्याचे आवाहन केले. नागरिक, पर्यटक व भाविकांसाठी सूचना करताना ते म्हणाले, “प्लॅस्टिक वापरावर निर्बंध आणून पर्यायी साधनांचावापर करावा, पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसाठी खरेदीवेळी ५० रुपये अथवा १०० रुपये अनामत रक्कम भरावी व रिकामी बाटली परत केल्यास ती रक्कम परत मिळेल असा नियम करणे, प्रत्येक दुकानदाराने स्वामी समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपलब्ध किंवा स्वतःच्या डस्टबिनचा वापर करावा, सरपंच व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी कापडी पिशव्यांचा पुरवठा, जनजागृती फलक उभारणी, दंडात्मक कारवाई, कचरा व्यवस्थापन व घंटागाडीची व्यवस्था आदी बाबींवर सूचना मांडल्या.
या कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप ( रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, सरपंच, दुर्गनाद प्रतिष्ठान, कर्म प्रतिष्ठान, श्री समर्थ सेवा मंडळ, श्री रामदास स्वामी संस्थानचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत वाहनतळ, पार्किंग मार्ग, पायरी मार्ग, तसेच किल्ल्यावरील दुकाने व परिसरात स्वच्छता करण्यात आली. या वेळीजंगलात, वनक्षेत्रात कचरा टाकू नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, वनक्षेत्रातील जमिनीच्या मोजणी अहवालास सर्वांनी मान्यता द्यावी, अतिक्रमण आढळल्यास ते त्वरित हटविण्यात येईल, तसेच किल्ले सज्जनगड परिसरात वणवा लागू नये, यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी पार पाडावी…
अमोल सातपुते, उपवनसंरक्षक.

Back to top button
Don`t copy text!