दासनवमी महोत्सवातील ‘मोगरा फुलला..’भक्तीगीतांच्या कार्यक्रमास प्रतिसाद

शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी नंदकुमार देशपांडे यांचे प्रवचन रविवार दि. 8 फेब्रुवारी रोजी मंजुषा पाटील यांचे सुश्राव्य गायन


सातारा- येथील समर्थ सदन येथे मोगरा फुलला हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करताना सातारचे स्थानिक कलाकार. (छाया – अतुल देशपांडे ,सातारा)
स्थैर्य, 6 जानेवारी, सातारा – दासनवमी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या विविध कार्यक्रमांना सातारकर रसिक प्रेक्षकांची मोठी दाद लाभत आहे .भजन, कीर्तन ,प्रवचन, दासबोध पारायण यासारख्या विविध उपक्रमांनी सध्या सातारच्या राजवाडा परिसरातील संत ज्ञानपीठ अर्थात समर्थ सदन हे शेकडो सातारकरांच्या उपस्थितीने भरून जात आहे.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सातारा येथील स्थानिक गायक कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या प्रकारात भक्ती गीतांचा.. मोगरा फुलला ..आणि त्याला रसिक सातारकर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या कार्यक्रमात कलाकारांनी ..स्वस्ति श्री गणनायकाने ..प्रारंभ करून.. गणपती गजानन..सादर केले. त्यानंतर समर्थ रामदास रचित ..आरंभी वंदीन अयोध्येचा राजा..सादर करत.. विश्वाचे अर्थ प्रकटले ..सादर झाली. श्रीराम बोला मंत्र हा सोपा ..सादर होत ..पद्मनाभा नारायणा.. ही अनंत वासुदेवाची आळवणी झाली. राम नाम गुणगान ..करीत ..कौशल्येचा राम बाई.. ही अतिशय सुरेख सादर झाला .माझी रेणुका माऊली.. सादर होताना.. स्वामी माझा राम रे..ही बाळासाहेब चव्हाण सरांनी सादर केले .नाम गाऊ नाम घेऊ.. सादर होत ..सांगा मुकुंद कुणी हा पाहिला.. ही ओठावर येणारी गीते गुणगुणतच प्रेक्षकांनी या गायक कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजका सौ.मिना सुपनेकर यांनी ..मोगरा फुलला ..सादर करत ..नारायणा, रमा रमणा ..हे गीत दिपश्री सुकाळे यांनी सादर केले. सुतार सरांनी गायलेले ..ध्यान लागले रामाचे ..अतिशय सुरेख सादर होत मयुरी कुलकर्णींनी सादर केलेले ..पायोजी मैने राम रतन धन पायो ..सादर झाले .श्री रामचंद्र कृपालु भजमन.. सादर होत ..सावधान सावधान..हे सुतार सरांचे आळवणे होत ..तीर्थाचे हे तीर्थ ..मीना सुपनेकर यांनी सादर करून या गायनसेवेची सांगता झाली.

या गायन कार्यक्रमात सौ. मीना सुपनेकर, सौ. मयुरी जोशी, सौ.दीपश्री सुकाळे, सौ.केतकी ताटके, बाळासाहेब चव्हाण, श्री.सुतार, सुहास फडके, ए .आर .कुलकर्णी यांनी सहभाग घेतला होता. या सर्व गायक व वादक कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने समर्थ विद्यापीठाचे कुलपती व ज्येष्ठ समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर रामदासी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास समर्थ सेवा मंडळाचे विश्वस्त प्रवीण कुलकर्णी गुरुजी ,संतोष वाघ, रवी बुवा आचार्य ,सुनील कुलकर्णी, देसाई वहिनी यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त नंदकुमार देशपांडे यांचे प्रवचन सादर होणार आहे.रविवार दि. 8 फेब्रुवारी रोजी मंजुषा पाटील यांचे सुश्राव्य गायन होणार असून त्यांना संवादिनीवर साथ स्वरूप दिवाण, तबलासाथ रोहित मुजुमदार व टाळावर साथ आनंद टाकळकर करणार आहेत.या कार्यक्रमासाठी सातारा येथील रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट हे सह प्रायोजक म्हणून लाभले आहेत.


Back to top button
Don`t copy text!