
दैनिक स्थैर्य । दि. 04 ऑगस्ट 2025 । फलटण । येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि नागरिकांनी उत्सव साजरा करताना आपल्या गौरवशाली पारंपारिक परंपरांचे जतन करावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथील उमाजी नाईक चौक येथे ‘श्रीमंत सत्यजितराजे गणेशोत्सव मंडळा’च्या वार्षिक अहवाल वाचन व पाद्यपूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, “गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा नाही, तर तो आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. यंदाच्या गणेशोत्वात सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर द्यावा.”
यावेळी त्यांनी सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचेही आवाहन केले. कार्यक्रमाला श्रीमंत सत्यजितराजे गणेशोत्सव मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.