स्थैर्य, कोरेगाव,दि. 19 : जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरदार विसरुन महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला खरा महाराष्ट्र धर्म जागवत अविरतपणे लढा देनाऱ्या कोरेगाव तालुक्यातील आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, प्रशासकीय सेवेत व पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या महिला कोरोना योध्यांचा सन्मान माझ्या व सौ. वैशाली शशिकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
त्यामध्ये डॉ. वैशाली मोरे, डॉ. मनीषा होळ, जास्मिन पटेल, प्रतिभा बोडके, सारिका पवार, सुषमा शेडगे, प्रगती लोहार, विद्या जाधव , रुपाली सुतार इत्यादींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
कोरेगाव प्रांताधिकारी किर्ती नलवडे, तहसीलदार रोहिणी श्रीमती शिंदे व गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन कोरोना योद्धा सन्मान सौ. समिंद्रा जाधव, सौ. संजना जगदाळे व श्रीमती प्रतिभा बर्गे यांच्या हस्ते करण्यात आला.
आलेल्या संकटाला न घाबरता त्याच्याशी ताठ मानेने लढण्याची उज्वल परंपरा आणि वारसा राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर या व इतर अनेक स्त्रियांच्या रूपाने महाराष्ट्राला तो लाभला आणि त्यांच्याच विचारांवर आणि आदर्शावर पाऊल ठेवत कोरेगाव मतदार संघातील आदर्श महिलांनी केलेले महान कार्य सबंध देशासाठी, महाराष्ट्रासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे असे यावेळी सौ. वैशाली शिंदे म्हणाल्या. पुढे बोलताना सौ. वैशाली शिंदे म्हणाल्या, काम नव्हे तर कर्तव्य या जाणिवेतून आपणाकडून होत असलेले हे कार्य कोणत्याही व्रतापेक्षा कमी नाही आणि महाराष्ट्र हे कधीही विसरू शकणार नाही.
श्रीमती प्रतिभाताई बर्गे यांनी कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये गीतांजली पवार व वैजयंती जगदाळे यांची तालुका अध्यक्ष पदी, शोभा कर्मे व नीलिमा कदम यांनी चिटणीस पदी व वैशाली गायकवाड यांची सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला निरीक्षक सौ. भारती शेवाळे, राष्ट्रवादी महिला सातारा जिल्हा अध्यक्ष समिंद्रा जाधव, कोरेगाव विधानसभा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. संजना जगदाळे, राष्ट्रवादी महिला तालूकाअध्यक्षा सौ. प्रतिभा बर्गे, नलिनी जाधव व राष्ट्रवादी महिला सेलच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.