स्वच्छता कर्मचार्यांना कायम नियुक्तीचे पत्र प्रदान करताना सौ.दिपाली निंबाळकर. समवेत सनी अहिवळे, पांडुरंग गुंजवटे, प्रसाद काटकर.
स्थैर्य, फलटण दि.१२ : महाराष्ट्र शासनाच्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आरोग्य विभागाकडे कर्मचार्यांना वारसा हक्काने घेणेची तरतुद आहे. त्यानुसार फलटण नगरपरिषदेकडील आरोग्य विभागाकडील आस्थापनेवर सफाई कर्मचार्यांची पदे भरण्यात आलेली होती. सदर कर्मचार्यांचा परिविक्षाधिन कालावधी संपल्याने त्यांना मुदतवाढ देवून दिनांक 11 मार्च 2020 च्या विशेष सभेतील ठराव क्र.59 नुसार सेवेत कायम करण्यात आले आहे. यामुळे या सफाई कर्मचार्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
आरोग्य विभागातील सफाई कर्मचार्यांना सेवेत कायम केलेबाबतचे पत्र पालिकेच्या स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती सौ.दिपाली निंबाळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती सनी अहिवळे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रकाश तुळसे, प्रभारी स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव, भांडारपाल प्रकाश पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.