स्थैर्य, मुंबई, दि. १५ : मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या अनेक सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत संस्थेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी आज बुधवारी बैठक होणार आहे. लॉकडाऊन काळात ज्या २८ जणांना नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने मदत केली, त्यापैकी अनेकांनी गेल्या पाच ते दहा वर्षांत किंवा किमान तीन वर्षांत एकाही नाटकाची निर्मिती न करणाऱ्या लाेकांनाही सरसकट मदत दिल्याने राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे.अध्यक्ष अजित भुरे, उपाध्यक्ष विजय केंकरे, काेषाध्यक्ष वैजयंती आपटे यांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत तर प्रशांत दामले, सुनील बर्वे, लता नार्वेकर, श्रीपाद पद्माकर, नंदू कदम, राकेश सारंग, अनंत पणशीकर, चंद्रकांत लाेहाेकरे, महेश मांजरेकर, दिलीप जाधव यांनी मंगळवारी राजीनामे दिले.
मदत व्हावीच पण…
नाट्य व्यावसायिक निर्मात्यांना मदत द्यावी, त्याला काेणताही आक्षेप नव्हता. पण, गेल्या काही वर्षांत एकही नाटक न केलेल्यांना बेकायदा मार्गाने पैसे देणार असाल तर त्याला पाठिंबा कसा देणार? प्रशांत दामले, नाट्यनिर्माते