दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील आखरी रास्ता या ठिकाणी जनावरांची कत्तल केली जाते. जनावरांची कत्तल केल्यानंतर राहिलेली घाण रस्त्याच्या बाजूला वारंवार टाकली जात आहे. त्यामुळे नागरिकांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
या घाणीमुळे मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणाहून जाताना नागरिकांना नाक दाबून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून या नागरिकांनी अशा प्रकारची घाण रस्त्याकडेला टाकणार्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.