फलटण तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न; वाचा तुमच्या गावात कोणते आरक्षण ?


दैनिक स्थैर्य । 4 जुलै 2025 । फलटण । आगामी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पूर्वी सोडत करण्यात आलेली सर्व आरक्षणे अधीगृहीत अर्थात रद्द करण्यात आलेली आहेत. फलटण तालुक्यातील सर्वच्या सर्व 131 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण सोडत नुकतीच संपन्न झाली आहे. त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 19 तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीसाठी 35 व इतर सर्वसाधारण खुले म्हणून 76 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे.

शासन निर्णयानुसार फलटण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ही नव्याने काढण्यात आली फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत पुढील प्रमाणे झालेली आहे.

अनुसूचित जमातीसाठी ढवळेवाडी (आसू) ही एकमेव ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण (पुरुष) जिंती, पवारवाडी, गोखळी, मुंजवडी, सरडे, निंभोरे, विंचुर्णी, हनुमंतवाडी व खामगाव या नऊ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी वेळोशी, शिंदेनगर, गुणवरे, खुंटे, राजुरी + भवानीनगर, निंबळक, वाजेगाव, आसू, दालवडी, माळेवाडी, मिरेवाडी (दालवडी) या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (पुरुष) हिंगणगाव, काशीदवाडी, शेरेचीवाडी, विठ्ठलवाडी, राजाळे, तरडफ, मठाचीवाडी, तरडगाव, रावडी बुद्रुक, धुमाळवाडी, शिंदेमाळ, उळुब, वाखरी, कुसुर, धुळदेव, खडकी, परहर खुर्द तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी वाघोशी, भाडळी बुद्रुक, सोनवणे बुद्रुक, आदर्की बुद्रुक, तांबवे, नाईकवाडी, टाकूबाईचीवाडी, मलवडी, पाडेगाव, शेरेशिंदेवाडी, बोडकेवाडी, जोर, वाखरी, जोर, कुरवली, साठे, ठाकूरकी, मिरगाव, उपळवे, झडकबाईचीवाडी या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत.

तर सर्वसाधारण खुला (पुरुष) म्हणून सोनगाव, सस्तेवाडी, जावली, गिरवी, झिरपवाडी, पिंपळवाडी, सुरवडी, भाडळी खुर्द, होळ, आदर्की खुर्द, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, कोळकी, मुरूम, दुधेबावी, बीबी, कांबळेश्वर, पिंपरद, अलगुडेवाडी, शेरेचीवाडी, तिरकवाडी, नांदल, फडतरवाडी, कोरेगाव, वडजल, तावडी, जाधववाडी, मुळीकवाडी, घाडगेवाडी, जाधवनगर, सावंतवाडी, माझेरी, निरगुडी, ढवळ, शिंदेवाडी, सोमंथळी, सालपे तर सर्वसाधारण महिलांसाठी सांगवी, भिलकटी, खटकेवस्ती, कुरवली खुर्द, सासकल, आळजापूर, कुरवली बुद्रुक, वडले, चौधरवाडी, विडणी, टाकळवाडी, आंदरुड, खराडेवाडी, कापशी, आरडगाव, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, मिरढे, चव्हाणवाडी, चांभारवाडी, वाठार निंबाळकर, जाधववाडी, आसू, सासवड, फरांदवाडी, मिरेवाडी, कुसुर, कोऱ्हाळे, डोंबाळवाडी, घाडगेमळा, ढवळेवाडी, निंबळक, पिराचीवाडी, मानेवाडी, दर्याचीवाडी, गोळेगाव, परहर बुद्रुक, बरड, गोळेवाडी या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!