फलटण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची २ जानेवारीला आरक्षण सोडत


दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | सातारा |
जिल्हाधिकारी सातारा यांचेकडील आदेशानुसार फलटण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती सभागृह, फलटण येथे काढण्यात येणार आहे.

फलटण तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत निघणार्‍या २२ ग्रामपंचायतींसाठी
१) अनुसूचित जाती महिला – २
२) अनुसूचित जमातीसाठी महिला – १
३) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी खुला – ३ आणि महिला – ३
४) सर्वसाधारण प्रवर्गासाठी – खुला – ७ आणि महिला – ६

असे आरक्षण आहे.

जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती तसेच सन २०२५ या वर्षात नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रमानुसार अंतिम प्रभाग रचना दि. १५/०१/२०२५ रोजी प्रसिध्द होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!