स्थैर्य, फलटण दि.29 : फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसिलदार समीर यादव यांनी जाहीर केली. यामध्ये नुकत्याच निवडणूक झालेल्या 80 ग्रापंचायतींसोबत आगामी काही वर्षांमध्ये निवडणूक होणार्या 51 ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. फलटण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या कोळकी ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले असून पिंपळवाडी (साखरवाडी) साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), निंबळक, विडणी, खुंटे, वाठार निंबाळकर, आरडगाव साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), जाधववाडी (फ.), सोनगाव साठी अनुसूचित जाती (महिला), फरांदवाडी, सांगवी साठी अनुसूचित जाती (सर्वसाधारण), जोर (कुरवली खु.) या एकमेव ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती (महिला) असे आरक्षण सरपंचपदासाठी सोडतीअंती निश्चित झाले आहे.
फलटण तालुक्यात 80 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूका नुकत्याच पार पडल्यानंतर आज दि. 29 जानेवारी रोजी येथील प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे तालुक्यातील सर्व 131 ग्रामपंचायत सरपंच पद आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करुन जाहीर करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सौ. अमिता गावडे, पंचायत समिती माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. प्रतिभा धुमाळ, सदस्य सचिन रणवरे, बाळासाहेब ठोंबरे, निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील, फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या 80 ग्रामपंचायतींमध्ये आत्ता तर उर्वरित 51 ग्रामपंचायतींमधून त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर सदरचे आरक्षण लागू होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित प्रवर्गाचा सदस्य नसेल त्या ठिकाणचे आरक्षण जिल्हाधिकारी बदलून देणार असल्याची माहिती, तहसिलदार समीर यादव यांनी यावेळी दिली.
तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींचे निश्चित करण्यात आलेले आरक्षण पुढील प्रमाणे –
अनुसूचित जाती महिला (एस.सी. महिला)
1.धुळदेव
2.जाधववाडी (फलटण)
3.मुळीकवाडी
4.शेरेचीवाडी (ढवळ )
5.घाडगेवाडी
6.माळेवाडी
7.सोनगाव
8.तावडी
9.धुमाळवाडी
10.मिरेवाडी(दालवडी)
अनुसूचित जाती सर्वसाधारण (एस.सी. महिला अथवा पुरुष)
1.तांबवे
2.फरांदवाडी
3.मिरेवाडी(कुसुर),
4.शेरेशिंदेवाडी
5.को-हाळे
6.डोंबाळवाडी
7.साठे
8.सांगवी,
9.घाडगेमळा
अनुसूचित जमाती महिला (एस.टी. महिला)
1.जोर(कुरवली खु)
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओ.बी.सी. महिला)
1.जोर (वाखरी)
2.होळ
3.पवारवाडी
4.परहर बु.
5.झिरपवाडी
6.पिंपळवाडी (साखरवाडी)
7.तिरकवाडी
8.चांभारवाडी
9.विंचूर्णी
10.भाडळी खु.
11.टाकुबाईचीवाडी
12.हणमंतवाडी
13.कोरेगाव
14.जावली
15.परहर खु.
16.कांबळेश्वर
17.नांदल
18.अलगुडेवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (ओ.बी.सी. महिला अथवा पुरुष)
1.टाकळवाडे
2.सालपे
3.चव्हाणवाडी
4.मिरढे
5.रावडी खु.
6.निंबळक
7.मानेवाडी
8.विडणी
9.विठ्ठलवाडी
10.खुंटे
11.जाधववाडी (तामखडा)
12.वाठार (निंबाळकर)
13.आरडगाव
14.कुरवली (बु)
15.द-याचीवाडी
16.सासकल
17.ऊळुंब
खुला प्रवर्ग महिला (महिला राखीव)
1.वडजल
2.बिबी
3.सोनवडी(खु)
4.कापडगाव
5.काशिदवाडी
6.पिंपरद
7.हिंगणगाव
8.खटकेवस्ती
9. दालवडी
10.मुरुम
11.रावडी(बु)
12.गिरवी
13.आसू
14.मिरगाव
15.झडकबाईचीवाडी
16.जिंती
17.तरडफ
18.कुसुर
19.गोळेगाव
20.सस्तेवाडी
21.सुरवडी
22.मुंजवडी
23.सरडे
24.मठाचीवाडी
25.वाखरी
26.खामगाव
27.शेरेचीवाडी (हि)
28.वडगाव
29.सासवड
30.राजाळे
31.कोळकी
32.निंभोरे
33.आदर्की खु.
34.जाधवनगर
35.फडतरवाडी
36.सावंतवाडी
37.गोळेवाडी
38.दुधेबावी
सर्वसाधारण (महिला अथवा पुरुष)
1.माझेरी(पु)
2.नाईकबोमवाडी
3.चौधरवाडी
4.शिंदेमाळ
5.मलवडी
6.भाडळी बु.॥
7.ठाकुरकी
8.बोडकेवाडी
9.खडकी
10.वाघोशी
11.आदर्की बु.॥
12.तरडगाव
13.वडले
14.बरड
15.सोनवडी बु.॥
16.शिंदेनगर
17.पाडेगाव
18.उपळवे
19.गोखळी
20.वेळोशी
21.पिराचीवाडी
22.ढवळेवाडी(निं)
23.तडवळे
24.ताथवडा
25.काळज
26.कापशी
27.सोमंथळी
28.खराडेवाडी
29.आंदरुड
30.आळजापूर
31.शिंदेवाडी
32.कुरवली खु.॥
33.भिलकटी
34.ढवळ
35.निरगुडी
36.गुणवरे
37.ढवळेवाडी (आसू)
38. राजुरी