भिलकटी रेल्वेलाईनजवळ कत्तलीसाठी नेणार्‍या तीन जर्शी गायींची सुटका


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
भिलकटी रेल्वेलाईन (ता. फलटण) जवळ महिंद्र बलेरो पांढरे रंगाची पिकअप टेम्पो गाडी (क्र.एमएच-१२-एक्यू-३७७६) मध्ये ३ जर्शी गायी विना चारापाण्याची कत्तलीसाठी घेऊन जात असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडून त्या जर्शी गाईंची सुटका करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार सौरभ सोनवले (मानद प्राणी कल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन) यांनी पोलिसात दिली.

या प्रकरणी टेम्पोचालक इंद्रजित विश्वास पैठणकर (वय ३५, रा. इरिगेशन कॉलनी, माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरोधात प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पो.ह. पिसे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!