दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२४ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत एस. टी. स्टॅन्ड येथील नातेपुते ते फलटण जाणार्या रस्त्यावर दि. १६ जुलै २०२४ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांतून कत्तलीसाठी घेऊन निघालेल्या ९ म्हैशींची (अंदाजे किंमत ९० हजार रुपये) सुटका करण्यात आली आहे. यावेळी सुमारे दोन पिकअप वाहने (क्र. एमएच १३ सीजे ०८४४ व क्र. एमएच ४५ एएफ ४९९१) व ९ म्हैशी असा सुमारे १०,९०००० रुपयांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. याची फिर्याद शिवराज शशिकांत निगडे (रा. बागेवाडी, बरड ता. फलटण) यांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी प्रविण रामचंद्र रणदिवे (वय २४, रा. तावशी, ता. पंढरपूर जि. सोलापूर), महादेव सिद्राम पवार (वय ५२, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावर प्राण्यांचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास फौजदार मठपती करत आहेत.