स्थैर्य, सातारा, दि. 30 : आता देशात अनलॉक 2.0 सुरू झाले आहे. जिल्ह्यात मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व आस्थापनांना 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु व्यापारी बाजारपेठ सुद्धा याच वेळेस बंद होत असल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी व्यापारी बाजार पेठ या सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठीची परवानगी मिळावी म्हणून भाजपचे विद्यमान नगरसेवक आणि जिल्हा सरचिटणीस श्री.विजयकुमार काटवटे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, शासनाने काढलेल्या परिपत्रकात अत्यावश्यक व जीवनावश्यक व्यापारी आस्थापने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील व्यापारी आस्थापनेदेखील सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, आणि बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळावी तसेच शहरातील व्यापारी आस्थापने चालू करत असताना खालील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याची सामान्य जनतेच्या वतीने हमी दिली आहे.