दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । सातारा । शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षामध्ये Mahadbt.mahait.gov.in या ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया 14 डिसेंबर 2021 पासून सुरु झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील 2 हजार 160 अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत. हे अर्ज शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज 15 मे 2022 पर्यंत मंजुरीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा कार्यालयाकडे पाठविण्यात यावेत. महाविद्यालयांनी कार्यवाही न केल्यास व त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालय व महाविद्यालय प्रशासनाची राहिल, असे समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी कळविले आहे.