दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । गोखळी । गोखळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य सौ. रंजना राधेश्याम जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोखळी येथे व्यसनमुक्त युवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र ज्ञानदेव फडतरे यांच्या हस्ते, गोखळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ध्वजारोहण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा गोखळीचे शाखाप्रमुख राहुल वरे यांचे हस्ते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गोखळीचे ध्वजारोहण गोखळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे यांचे हस्ते, हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ध्वजारोहण सोसायटीचे चेअरमन निवृत्ती कदम यांच्या हस्ते, प्राथमिक उपआरोग्य केंद्र गोखळी येथील ध्वजारोहण सरपंच सुमनताई हरिभाऊ गावडे यांच्या हस्ते, हनुमान माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळी येथे आंतरराष्ट्रीय कोर्फबोल खेळातील भारतीय संघातील खेळाडू व माजी विद्यार्थी प्रणव पोपट पोमणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
गावातील जिल्हा परिषद शाळा, गोखळी विकास सोसायटी, हनुमान विकास सोसायटी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गोखळी सर्व संस्थांचे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हनुमान विद्यालयाच्या पटांगणावर सर्व कार्यक्रमांची सांगता झाली यावेळी जिल्हा परिषद शाळा गोखळी, हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळी, अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सामूहिक कवायत, लेझीम कवायत, देशभक्तीपर गीते नृत्य गायन,वादन महत्त्वाचा भरदार कार्यक्रम सादर करून पालकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
यावेळी हनुमान माध्यमिक विद्यालयास दादासाहेब हरिहर यांनी एक हात आपल्या शाळेच्या मदतीसाठी या उपक्रमांतर्गत दिलेल्या ३००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकीचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच सुमनताई गावडे उपसरपंच सागर गावडे पाटील हनुमान विद्यालय स्कूल कमिटीचे अध्यक्ष बजरंग गावडे (सवई), माजी सरपंच नंदकुमार गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, हनुमान विकास सोसायटीचे माजी चेअरमन हनुमंत गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे, कोरेगाव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी संजयकुमार बाचल, हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन निवृत्ती कदम, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शेख मॅडम, हनुमान माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ अभंग, जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले, ग्रामपंचायत माजी उपसरपंच रंजना जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. अमित गावडे, अभिजीत जगताप, हनुमंत जगताप, अमोल हरीहर सह माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी आरोग्य कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री राधेश्याम जाधव यांनी हनुमान माध्यमिक विद्यालय “एक हात आपल्या शाळेच्या मदतीसाठी”या उपक्रमाअंतर्गत केलेल्या कामाची माहिती सर्वांना दिली. व सर्व देणगीदारांचे आभार मानले.