स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २९: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अर्थसंकल्पीय अभिभाषणात म्हणाले- ‘गेल्या वर्षी तीन महत्त्वाची कृषी सुधार बिले मंजूर झाली. छोट्या शेतकर्यांना होणारा फायदा लक्षात घेता बर्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी त्याचे समर्थन केले होते. या कायद्याची दोन दशकांपासून मागणी होती. या कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या आहेत. सरकारही त्याचे अनुसरण करेल. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान करणे दुर्दैवी आहे. कायदा व नियम पाळले पाहिजेत.’
राष्ट्रपती कोविंद म्हणाले- ‘कितीही मोठे आव्हान असले तरी भारत थांबणार नाही’
राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, ‘कितीही मोठे आव्हान असो. ना आम्ही थांबणार ना भारत थांबणार. एकता आणि बापूंच्या प्रेरणेने आपल्याला शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता दिली होती. भारताची महानता हे अंतिम सत्य आहे. सर्व जण एक व्हा. आज भारतीयांच्या या एकतेने आपल्याला बर्याच समस्यांमधून बाहेर आणले आहे. कोरोना, भूकंप, पूर, सीमेववरील अप्रत्यक्ष तणाव झाला. आपण सर्वांनी एकत्रित येऊन या समस्यांचा सामना केला.
‘माझ्या सरकारने MSP मध्ये दीडपट वाढ केली’: राष्ट्रपती
राष्ट्रपती म्हणाले की, ‘आत्मनिर्भर भारत मोहीम केवळ भारतात निर्मिती करण्याची नाही तर भारतातील लोकांना बळकटी देण्याची संधी आहे. यामुळे भारतीय शेती मजबूत होईल. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून MSP मध्ये दीडपट वाढ करण्यात आली आहे. माझे सरकार MSP वर विक्रमी खरेदी करत आहे आणि खरेदी केंद्रेही वाढवत आहेत. जुन्या सिंचन प्रकल्पांसह आधुनिक सिंचन तंत्रज्ञानही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतकरी जोडले जात आहेत.
पंतप्रधान म्हणाले – ‘लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे पालन करायला हवे’
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. तत्पूर्वी संसदेत पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना सांगितले की, ‘हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्वाचे आहे. स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्ने वेगाने पूर्ण करण्याची ही सुवर्णसंधी आली आहे. या दशकाचा पूर्ण उपयोग करुन चर्चा केली पाहिजे. सर्व प्रकारच्या विचारांचे मंथन व्हावे. लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे अनुसरण करत. लोकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन आम्ही ते पुढे घेऊन जाऊ.’
पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की, 2020 मध्ये एक नाही, अर्थमंत्र्यांना विविध पॅकेजच्या रुपात एक प्रकारे 4-5 मिनी बजेट द्यावे लागले. म्हणजेच 2020 एक प्रकारे मिनी बजेटचे चक्र सतत चालू राहिले. यामुळे हे बजेट देखील त्याच 4-5 बजेटच्या मालिकांमध्येही पाहिले जाईल यावर मला विश्वास आहे.
अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण सादर करतील
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. लोकसभा सचिवालयानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले अधिवेशन 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर दुसरे सेशन 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत चालेल. 17 व्या लोकसभेच्या पाचव्या सत्रामध्ये 35 सिटिंग्स होतील. ज्या पहिल्या पार्टमध्ये 11 आणि दुसऱ्या पार्टमध्ये 24 ठरवण्यात आल्या आहेत.
19 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार टाकला
परंपरेनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद पहिल्याच दिवशी भाषण करीत आहेत, पण 19 पक्षांनी या भाषणावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना, अकाली दल या मोठ्या पक्षांचा समावेश आहे. ते म्हणतात की गेल्या सत्रात केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे ज्या पद्धतीने पारित केले ते चांगले नव्हते.
ज्या पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला त्यांच्यात कॉंग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी,JKNC, DMK, TMC, RJD, CPI-M, CPI, IUML, RSP, PDP, MDMK, केरळ कॉंग्रेस (एम), BSP आणि AIUDF यांचा समावेश आहे. एक दिवस अगोदर या पक्षांनी संयुक्त निवेदन काढून यासंदर्भात माहिती दिली. नंतर आम आदमी पार्टी आणि शिरोमणी अकाली दलानेही बहिष्कार घालण्याची घोषणा केली.
शेतकऱ्यांचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे
तीन कृषी कायदे आणि शेतकरी चळवळी दरम्यान 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे म्हणणे आहे की मोदी सरकारने विरोधकांशी चर्चा न करता सभागृहात तीनही कृषी कायदे जबरदस्तीने पारीत केले.
सोशल डिस्टेंसिंगची काळजी घेतली जात आहे
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान या अधिवेशनात प्रथमच मध्यवर्ती सभागृहाशिवाय लोकसभा आणि राज्यसभेतही खासदार बसले आहेत. असे सोशल डिस्टेंसिंगमुळे करण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील.