दैनिक स्थैर्य | दि. 27 जानेवारी 2025 | फलटण | महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जेष्ठ कवयित्री सौ. रुचा भल्ला यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवार, २६ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा. दत्ता चोरमले, सचिव सुरेश चोरमले, विश्वस्त अविनाश चोरमले, राजू चोरमले, नेताजी चोरमले, सुनील चोरमले, राजेंद्र चोरमले, बंडोपंत चोरमले तसेच महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले, मुख्याध्यापक वैशाली शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना जेष्ठ कवयित्री रुचा भल्ला म्हणाल्या, “दिव्यांग शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा ध्वजारोहण करण्याचा आनंद काही वेगळाच असून आज मला माझ्या शालेय जीवनातील आठवणी या निमित्ताने जागृत झाल्या.” त्या म्हणाल्या, “हा राष्ट्रीय कार्यक्रम माझ्या दृष्टीतून खूप अभिमानास्पद असून या ठिकाणी आल्यानंतर इथला परिसर पाहून खूप खूप समाधान झाल्याचे ही शेवटी त्यांनी सांगितले.”
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देश प्रेमावर आधारित एक ॲक्ट सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव सौ. वैशाली चोरमले यांनी केले.
७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मूकबधिर विद्यालयात संपन्न झालेला हा कार्यक्रम देशभक्ती व समाजातील सर्व घटकांच्या एकतेचे प्रतीक होता. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रीय उत्सवांशी जोडण्याचा प्रयत्न होतो, ज्यामुळे त्यांच्यात देशप्रेम व अभिमान जागृत होतो.