
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। फलटण । जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजन चा नुकताच पुणे येथे शपथविधी झाला. रिजन च्या कार्यकारणी मध्ये जैन सोशल ग्रुप फलटणच्या तिन प्रतीनीधी ची राज्यस्तरीय कमिटीवर निवड करण्यात आली.
महिला सक्षमीकरण कमिटी कन्वेनर म्हणून सौ. स्मिता बाहुबली शहा, व्यसनमुक्ती कमिटी कन्व्हेनर म्हणून डॉ. सूर्यकांत दोशी, योगा व मेडिटेशन सूर्यनमस्कार कमिटी कन्व्हेनर म्हणून सौ. सविता मिलिंद दोशी यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल नुतन पदाधिकार्यांचे जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे प्रेसिडेंट बिरेनभई शहा, महाराष्ट्र रिजन चेअरमन दिलीपभाई मेहता, सचिव सचिन शहा, व्हाईस चेअरमन सचिनभाई दोशी, कोल्हापूर झोन कॉर्डिनेटर सौ.रज्जूबेन कटारिया, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, माजी सचिव प्रीतम शहा, माजी अध्यक्ष तुषार गांधी, राजेंद्र कोठारी व सर्व संचालक पदाधिकारी, सदस्य यांनी अभिनंदन केले.