जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 5 : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 43, प्रवास करुन आलेले 5, असे एकूण  48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 1 ते 75 वर्षे वयोगटातील 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये माण तालुक्यातील खडकी येथील 44 वर्षीय पुरुष, इंजबाब येथील 28 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष,  मोगराळे 34 वर्षीय पुरुष, दानवलेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, वावरहिरे येथील 35 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 21 वर्षीय पुरुष, 22 व 25 वर्षीय महिला, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष.

कोरेगाव तालुक्यातील सुरली येथील 56 वर्षीय पुरुष, साप येथील 41 वर्षीय महिला.

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 25,36,47 वर्षीय पुरुष व 50,40,23 वर्षीय महिला, काळकूटवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.

जावळी तालुक्यातील बिरामणेवाडी येथील 16 व 45 वर्षीय महिला, सायगाव येथील 60 वर्षीय महिला.

सातारा तालुक्यातील जिहे येथील 20 वर्षीय युवक, शाहूनगर येथील 38 वर्षीय महिला, राधिका रोड येथील 50 वर्षीय्‍ पुरुष, खावली येथील 60 वर्षीय महिला, सदर बझार, कपिला पार्क येथील 40 वर्षीय महिला, मोळाचा ओढा येथील 25 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 13 वर्षीय युवती, 25 वर्षीय महिला व 1 वर्षाची बालिका, लिंब येथील 39 वर्षीय महिला. चोरगेवाडी येथील 30,16,48,36,24,20,40 वर्षीय पुरुष व 23, 45,75,35 वर्षीय महिला.

वाई तालुक्यातील अभेपूरी येथील 45 वर्षीय पुरुष

कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय युवती, कैलास अर्पाटमेंट सैदापूर येथील 30 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 48 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

घेतलेले एकुण नमुने 14716

एकूण बाधित 1304

घरी सोडण्यात आलेले 784

मृत्यु 55

उपचारार्थ रुग्ण 465


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!