स्थैर्य, सातारा दि.२: जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 44 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा शहरातील रंगोली कॉलनी 1, समतापार्क शाहूपूरी 1, चारभिंतीजवळ शाहूनगर 4, कामेरी 6, पाटखळ 1, आसले 1, आझादनगर 1, धनवडेवाडी 1, चिंचणेर निंब 1, कोंडवे 1, वनवासवाडी 1,
कराड तालुक्यातील करवडी 1, गोवारे 2,
फलटण तालुक्यातील डोळेगाव 1, तरडगाव 1, पाडेगाव फार्म 2,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, कलेढोण 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, भाडळे 1,
जावली तालुक्यातील कुंभारगणी 1, रायगाव 2, सायगाव 4, कुडाळ 1,
खंडाळा तालुक्यातील अंदोरी 1, अहिरे 1,
वाई तालुक्यातील मोडेकरवाडी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील मारीपेठ 1,
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या पिंगळी ता. माण मधील 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एकूण नमुने -287311
एकूण बाधित -54945
घरी सोडण्यात आलेले -52075
मृत्यू -1793
उपचारार्थ रुग्ण-1077