जिल्ह्यातील 256 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 12 बाधित नागरिकांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि. 15 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये फलटण तालुक्यातील  फलटण शहरातील मेटकरी गल्ली 1,  मंगळवार पेठ 5,  लक्ष्मीनगर 1,  मांडव खडक 2, मारवाड पेठ 1,  खाटीक गल्ली 1,  रविवार पेठ 1,  सोमवार पेठ 1, गुणावरे 8, कोऱ्हाळे 3, सिमेंट रोड फलटण 1, मलठण 1, ठाकूरकी  1, सस्तेवाडी 1, साखरवाडी 3.,  

वाई तालुक्यातील वाई शहरातील रविवार पेठ 4, सह्याद्रीनगर 2,  पसरणी मालकपेठ 2,  व्याजवाडी 3, विरमाडे 1,  जांब 4, मधली आळी 10, सोनगिरवाडी 3,  महात्माफुलेनगर 7, सिध्दनाथवाडी 1, यशवंतनगर 1, कडकी 1,  ओझर्डे –कदमवाडी 1,  शाहबाग 1,  प्राध्यापक कॉलनी 1,  शेंदूरजणे 1, रामडोहाळी 1, भोगाव 1,  वाई 1, ब्रम्हशाही 1, गंगापुरी 2, गणपती आळी 1, बावधन 2, उडतारे 1, भूईज 3.,

सातारा तालुक्यातील शाहूपुरी 9,  शेंद्रे 1,  निंब 6, मेघदूत कॉलनी कोडोली 3,  सातारा शहरातील शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 3,  सिव्हील 2,  शुक्रवार पेठेतील सुर्या कॉप्लेक्स 1,  मंगळवार पेठ 2,  करंजे 1,  शिवथर 1,  शाहूपुरी पोलीस स्टेशन 1,  न्यु विकासनगर खेड 1,  खावली 1,  शनिवार पेठ 2,  सदर बझार 1,  उत्तेकर नगर 1,  मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनी 1,  देगाव 1,  गोडोली  1,  पोलीस हेडक्वार्टर वसाहत 1,  कोडोली 1,  धावडशी  1.,  

कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठ 3, शिवाजी हौसिंग सोसायटी 1,  कोयनानगर 1,  कोल्हापूर नाका 1,  सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 5, दौलत कॉलनी 1 कार्वे नाका 1, मलकापूर 4,  बुधवार पेठ 4, शास्त्रीनगर मलकापूर 2, आगाशिवनगर 3, बनवडी 2,  रेठरे 1,  श्रध्दा क्लिनिक कराड 3,  मार्केट यार्ड कराड 2,  मंगळवार पेठ 1, शनिवार पेठेतील उर्दू शाळेजवळ 1, रुक्मिणी इस्टेट 1,  किवळ  2, काले 3, कोळे 1, म्होप्रे 1, उब्रंज खालकरवाडी 1,  गोळेश्वर 1, कराड 2, जखिणवाडी 6, शेरे 1, कराड शहर पोलीस  2, गोटे 4, वडगाव हवेली 3, खुबी 1, विद्यानगर 1., गोवारे 1,  कोयना वसाहत 2,  हिंगनोळे 1.,

पाटण तालुक्यातील मालदन 2.,

महाबळेश्वर तालुक्यातील देवळी 1.,

कोरेगाव  तालुक्यातील सोळशी नायगाव 1, वाठार किरोली 1,  कोरेगाव 1, करंजखोप 3,  विखळे 1, गिघेवाडी (पिंपोडे) 1, पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र 1.,

खटाव तालुक्यातील मोरोळे-मायणी 1, फडतरवाडी 1, जायगाव 3, मायणी 3,  वडूज 1, ज्योतिबा मंदिर गुंडवाडी 1.,

माण तालुक्यातील देवापूर 1, म्हसवड 3,  वरकुटे 1.,

जावळी तालुक्यातील मोरघर 1.,

खंडाळा तालुक्यातील पाडळी 1, लोणंद 1, शिरवळ 12,  नायगाव 1, खंडाळा 2, झगलवाडी 1.,

इतर जिल्हा – ताडदेव (मुंबई) 1, जेजूरी (पुणे) 1, पेठ वडगाव (हातकलंगणे-कोल्हापूर)1, रेठरे (वाळवा-सांगली) 1,  अंबिकानगर (सांगली) 1.

12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या शिरवडे ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष, मोरोळे ता. खटाव येथील 62 वर्षीय पुरुष,  साताऱ्यातील शनिवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष,  व मंगळवार पेठेतील 53 वर्षीय महिला, फडतरवाडी ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, बेलवडी ता. कराड येथील 44 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, व उंब्रज ता. कराड येथील 53 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर कराड येथील खाजगी रुग्णालयामध्ये ढेबेवाडी ता. पाटण येथील 83 वर्षीय पुरुष, कराडमधील मंगळवार पेठेतील 74 वर्षीय पुरुष,  व सोमवार पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा तसेच वाई येथील खाजगी रुग्णालयात सहृयाद्रीनगर येथील 56 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!